Gujarat Bridge Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश

गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
Gujarat Bridge Collapse
Gujarat Bridge CollapseEsakal

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग खाली कोसळला. ओव्हर ब्रिजचे पाच गडर्स एकाच वेळी खाली कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये काम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची आहे. यासंबधीचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

Gujarat Bridge Collapse
Taiwan Nepal Earthquake: तैवानमध्ये 5.6 रिश्टर स्केल भूकंपाचे तीव्र झटके, नेपाळही हादरलं

पालनपूरमध्ये आरटीओ सर्कलच्या जवळ पुलाचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे. रिक्षाचालक जीव वाचवण्यासाठी धावत असताना अचानक पुलाचा स्लॅब कोसळल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते आहे.

पूल कोसळल्याचा मोठा आवाज आला त्यानंतर आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. यासंबधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Gujarat Bridge Collapse
Israel-Hamas War: हमासची क्रूरता! गर्भवती महिलेचं पोट फाडलं अन् न जन्मलेल्या बाळाचीही केली हत्या, इस्राइलचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com