esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

गृहमंत्री अमित शाह

'अशिक्षित व्यक्ती देशावरील ओझं, त्यांना कर्तव्यांची माहिती नसते'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सत्तेमध्ये २० वर्ष पूर्ण केले आहेत. त्यानिमित्त सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Anil Deshmukh) यांची मुलाखत घेतली. यावेळी मोदींबाबत अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावेळी उत्तरे देताना त्यांनी देशाच्या शैक्षणिक दर्जावर देखील प्रकाश टाकला. अशिक्षित लोक देशावरील ओझं आहे. त्यांना देशाप्रती असलेल्या कर्तव्याची माहिती नसते, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं.

हेही वाचा: PM मोदी हुकूमशाह आहेत? अमित शाह म्हणाले...

''पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुलं शाळेत न जाण्याचं प्रमाण अधिक होतं. मात्र, मोदी यांनी मुलांना शाळेत दाखल करण्याची मोहीम राबवली. त्यासाठी एक पालकांची समिती तयार करून शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. परिणामी शाळाबाह्य मुलांचं प्रमाण हे आता एक टक्क्याच्या देखील खाली आलं. पण, एक अशिक्षित व्यक्ती देशावरील मोठं ओझं असतं. कारण त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती नसते, तसेच देशाप्रती आपले काय कर्तव्य आहेत? याची जाणीव देखील नसते. मग अशिक्षित व्यक्त एक चांगली नागरिक कशी होईल?''' असेही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, मोदी हुकमशाहीसारखे निर्णय घेतात, अशी टीका अनेकदा केली जाते. त्याबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला असता, ते म्हणाले ''मोदी लहान-लहान गोष्टींसाठी सर्वांचे मते जाणून घेतात. त्यांना लोकांची मते जाणून घेणे हे सर्वात महत्वाचे वाटते. त्यानंतर विचारपूर्वक पद्धतीने त्यावर निर्णय घेतात. हे सर्व निर्णय बैठकीमध्ये घेतले जातात. मात्र, बैठकीमध्ये नेमकं काय घडतं? याची माहिती जनतेला नसते. त्यामुळे मोदी निर्णय घेतात, असे सर्वांना वाटते. जनतेने निर्णय घेण्याचा अधिकार देखील मोदींना दिला आहे. पण, विरोधक खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीत. खोटी माहिती पसरवून मोदींची बदनामी करतात.'' असेही शाह म्हणाले.

loading image
go to top