नवी दिल्ली : देशातील अनेक गावांमध्ये हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांना नाईलाजाने पर्याय निवडावे लागतात. विशेषत: उसाच्या क्षेत्रात, बांधकाम किंवा वीटभट्ट्यांवर काम करणारी कुटुंबे आपल्यासोबत आपल्या मुलांनाही घेऊन जातात..मात्र, मागे राहणाऱ्या मुलामुलींचा सांभाळ आजी-आजोबांना किंवा मोठ्या भावंडांना करावा लागतो. त्यांना भावनिक ताणाबरोबरच घरातील जबाबदाऱ्याही निभावाव्या लागतात. स्थलांतर करणाऱ्या तसेच मागे राहणाऱ्या मुलांनाही शिक्षणातील खंड, मर्यादित आरोग्यसुविधा, बालमजुरी आणि सज्ञान होण्यापूर्वीच लग्नासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो..या आव्हानांवर मात करण्यासाठी जालना जिल्ह्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात युनिसेफ संबंधित जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) मदतीने ‘नातेवाईक आणि समुदाय-आधारित देखभाल उपक्रम’ राबवीत आहे. संबंधित गावातील मुलामुलींना नातेवाईक किंवा समुदाय सदस्यांच्या देखरेखीखाली ठेवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. देशातील बालसंरक्षण यंत्रणेतील संस्थात्मक पातळीपासून कुटुंबावर आधारित उपायांकडे वळण्यातील मोठा बदल यातून दिसतो..या उपायांत मुले वेगळे होऊ नये म्हणून कुटुंबांचे सशक्तीकरण, पालनपोषण आणि नातेसंबंधाची काळजी घेणे आदींचा समावेश आहे. देशात २०२१-२२ ते २०२३-२४ पर्यंत अशा गैर संस्थात्मक पद्धतीने काळजी घेतल्या जाणाऱ्या मुलांची संख्या चौपट झाली आहे. महिला व बालविकास मंत्रालय या वाढीचे श्रेय वात्सल्य मिशन अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांना देते..यात प्रायोजकत्व, पालनपोषण आदींसाठी मंत्रालयाकडून अनुदान दिले जाते. पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रातही मुलांसाठी कुटुंबावर आधारित संगोपनाचे महत्त्व आणि यासंदर्भातील वचनबद्धतेची पुष्टी करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युनिसेफ इंडियाच्या बालसंरक्षण तज्ज्ञ वंदना कंधारी म्हणाल्या, की कुटुंबाधारित देखभालीचे महत्त्व या परिषदेत पुन्हा अधोरेखित करण्यात आले..बालसंरक्षण तज्ज्ञ प्रभातकुमार म्हणाले, की कुटुंब आधारित देखभालीशी संबंधित कायदे मजबूत केले जात आहेत. एकात्मिक बाल संरक्षण योजनेपासून मिशन वात्सल्यपर्यंत कुटुंबावर आधारित देखभालीची सुरुवात होत असून राज्यांनी यात केलेल्या प्रगतीची मूल्यांकन करण्याची ही योग्य वेळ आहे. यासंदर्भातील चर्चासत्रात यावर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी संस्थात्मक देखभालीवर अधिक तर कुटुंब आधारित देखभालीवर कमी लक्ष दिले जात होते, ज्याला आम्ही कुटुंब वेगळे होण्यापासून प्रतिबंध म्हणतो. आता मिशन वात्सल्यसारख्या योजनेमुळे हा पिरॅमिड उलटा होऊन कुटुंब आधारित देखभालीवर अधिक लक्ष दिले जात आहे..नातेवाईकांचा आधारजालना जिल्ह्यातील दुधपुरी येथील दशरथ तांबे यांचा मुलगा व सून आपल्या मुलांसह स्थलांतर करत. मात्र, या वर्षी दशरथ यांनी नात शीतलच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तिला घरीच ठेवले जाईल, हे सुनिश्चित केले. स्थलांतरित कामगार व सरपंच शंकर गायकवाड यांनी स्थलांतर थांबविण्याचे ठरविले आहे. ते व त्यांचे पालक शिक्षणात खंड पडू नये म्हणून पाच पुतणे-पुतणींचा सांभाळ करत आहेत..Manipur News : ‘बंद’मुळे मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळित.संस्थांमध्ये वाढणाऱ्या मुलांना दीर्घकाळासाठी मानसिक व वर्तनविषयक आव्हानांचा सामना करावा लागतो. कुटुंबातील देखभालीमुळे त्यांना अधिक पोषक वातावरण मिळते. भारतात संस्थात्मक देखभालीपासून कुटुंब आधारित उपायांकडे वळण्याचे प्रमाण वाढत असताना एकही मूल मागे राहू नये, यावर लक्ष केंद्रित केले आहे.- वंदना कंधारी, बालसंरक्षण तज्ज्ञ, युनिसेफ इंडिया.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.