'अजिबात खपवून घेणार नाही', इंडिगोच्या 'त्या' कृतीवर सिंधिया संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiraditya Scindia

'अजिबात खपवून घेणार नाही', इंडिगोच्या 'त्या' कृतीवर सिंधिया संतापले

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सने रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले. त्यानंतर एअरलाइन्सवर टीका करण्यात आली. आता याप्रकरणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी व्यक्तव्य केले आहे. असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा: छ.शिवरायांच्या मुल्यांवर वाटचाल केल्यास देशाचे कल्याण -ज्योतिरादित्य सिंधिया

"आम्ही अशा प्रकारचे वर्तन अजिबात सहन करणार नाही. कोणत्याही व्यक्तीने अशा परिस्थितीतून जाऊ नये. मी स्वत: या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल", असं ट्विट ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं आहे. त्याचवेळी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून एअरलाइनला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. मुलाला शनिवारी एअरलाइन्सच्या रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर त्याच्या पालकांनीही फ्लाइटमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, नियामकाने या प्रकरणी इंडिगोकडून अहवाल मागवला आहे. ते म्हणाले की डीजीसीए या घटनेची चौकशी करत आहे आणि योग्य ती कारवाई करेल.

याबाबत इंडिगोला विचारले असता, त्यांनी "प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून, एका वेगळ्या दिव्यांग मुलाला 7 मे रोजी त्याच्या कुटुंबासह फ्लाइटमध्ये चढता आले नाही. कारण तो घाबरला होता. कर्मचाऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत तो शांत होण्याची वाट पाहिली. पण, त्याचा उपयोग झाला नाही. एअरलाइनने त्याची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या गावाला गेले, असं उत्तर इंडिगोने दिलं. तसेच प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी देखील वय्क्त केली.

Web Title: Union Aviation Minister Jyotiraditya Scindia Attack On Indigo Airlines For Denied Entry To Specially Abled Child

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top