Budget 2019 : काय झालं स्वस्त काय झालं महाग? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2019 : काय झालं स्वस्त काय झालं महाग?

-  काही गोष्ट स्वस्त तर काही गोष्ट महाग झाल्या आहेत. 

Budget 2019 : काय झालं स्वस्त काय झालं महाग?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये काही गोष्ट स्वस्त तर काही गोष्ट महाग झाल्या आहेत. 

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी झाल्या महाग आणि कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या याविषयी माहिती :

या गोष्टी होणार महाग

पेट्रोल-डिझेल - पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ होणार. प्रतिलिटर एक रुपया इन्फ्रास्टक्चर सेस आणि एक रुपया अतिरिक्त कर वाढवल्याने पेट्रोल-डि़झेलची किंमत वाढणार दोन रुपयांनी . 

तंबाखूजन्य पदार्थ - सिगरेट, गुटखा, तंबाखू या तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त कर आकारण्यात येणार.

पुस्तके - पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार

सोने - सोन्यावरील आयात कर 10 टक्क्यांवरुन 12.50 टक्के करण्यात आला. त्यामुळे आता सोने महागणार

काजू, पीव्हीसी पाईप, डिजिटल कॅमेरा, गाड्यांचे सुटे भाग, व्हिनएल फ्लोअरिंग, सिंथेटीक रबर, ऑप्टिकल फायबर

या वस्तू होणार स्वस्त 

इलेक्ट्रिक कार : विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात येणार असल्याने इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार

घरे स्वस्त होणार : भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल करणार.

विमा स्वस्त होणार