Budget 2019 : 'ब्रिफकेस'ची परंपरा निर्मला सीतारामन यांनी काढली मोडीत

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची परंपरा आहे. मात्र, आज सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढली. 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची परंपरा आहे. मात्र, आज सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढली. 

सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. यावेळी त्यांच्याकडे 'ब्रिफकेस' नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली.

त्यामागील कारण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितले, की अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2019 Nirmala Sitharaman not come with Briefcase