esakal | 'हम दो, हमारे दो' वेळी जावयाच्या जमिनीचा उल्लेख केला असता तर...अर्थमंत्र्यांच्या निशाण्यावर राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala sitharaman.jpg

आमचे मित्र (भांडवलदार) जावई नाहीत. असे लोक त्या पक्षाच्या आड लपले आहेत, ज्यांना जनतेने स्वीकारलेले नाही. आमचा अर्थसंकल्प गरीब आणि शेतकऱ्यांसाठी आहे, असेही त्या म्हणाल्या. 

'हम दो, हमारे दो' वेळी जावयाच्या जमिनीचा उल्लेख केला असता तर...अर्थमंत्र्यांच्या निशाण्यावर राहुल गांधी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, काँग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी शेतकरी कायद्यांवर यू टर्न घेतला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यानुसार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा होती की ते पंजाब सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देतील. तीन कृषी कायद्याविरोधात काही कमतरता काढतील. हे कायदे कसे शेतकरी विरोधी आहेत, हे सांगतील. 'हम दो, हमारे दो' वेळी जावयाला जमीन परत करण्यास सांगितलं असतं तर चांगलं झालं असतं. परंतु, असं काही तुम्ही बोलला नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.  

केंद्र सरकारवर भांडवलदारांचे समर्थक असल्याचा आरोप करण्यात येतो. याला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, गरीब लोक आणि देशातील सामान्य नागरिक सरकारचे मित्र आहेत, आणि सरकार त्यांच्यासाठीच काम करत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत गरीब, फेरीवाले, विक्रेत्यांना एक वर्षासाठी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. देशातील 50 लाख विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेतला. 

सीतारामन यांनी काँग्रेसचे नाव न घेता म्हटले की, आमचे मित्र (भांडवलदार) जावई नाहीत. असे लोक त्या पक्षाच्या आड लपले आहेत, ज्यांना जनतेने स्वीकारलेले नाही. आमचा अर्थसंकल्प गरीब आणि शेतकऱ्यांसाठी आहे, असेही त्या म्हणाल्या. 

हेही वाचा- फोटोसाठी पोझ देताना मिया खलिफा अचानक उठून ओरडू लागली; व्हिडीओ व्हायरल


दरम्यान, अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर दोन-तीन उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेले शौचालय, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या सामान्य नागरिक, गरिबांच्या फायद्यासाठी केलाय की उद्योगपतींसाठी असा सवाल केला होता. त्यावर सीतारामन यांनी सल्ला देताना म्हटले की, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटे आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षांनी या सर्व योजनांचा अभ्यास केला पाहिजे.