Budget 2019 : केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये

टीम ईसकाळ
Friday, 5 July 2019

मोदी सरकारमधील पहिला अर्थसंकल्प केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. दुसऱ्यांदा मोदी सरकार अर्थसंकल्प सादर करत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष आहे.   

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला.

आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेला सादर केला. या अहवालातील निष्कर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्‌विटद्वारे समाधान व्यक्त केले होते. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपतींकडे अर्थसंकल्प सुपूर्द केल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत.

'यंदाची निवडणूक ही आम्हाला विश्वास देणारी ठरली. नागरिकांनी आम्हाला न्यू इंडिया करण्यासाठी मतदान केले. काम करणारे सरकार अशी आमची ओळख झाली आणि त्याला नागरिकांनी पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची कार्यशैली नागरिकांना आवडली. गेल्या पाच वर्षांत न्यू इंडियासाठी कार्य सुरु केले असून, तेच पुढे जाईल,' असे मत अर्थमंत्री सितारामन यांनी मांडले. 

अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये

- पुढील काही वर्षांत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आमचे लक्ष्य आहे
- पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी चांगले सरकार निवडले
- भारतातल्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही केलेले काम पोहचले आहे
- मजबूत देशासाठी, मजबूत नागरिक हे आमचे लक्ष्य
- अन्न सुरक्षेवर आमच्या सरकारचा भर
- मेक इन इंडियावर सरकारचा भर
- मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लक्ष्य साध्य करू
- चीन आणि अमेरिकेनंतर भारताची अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरु आहे
- आशा, विकास आणि आकांक्षा यावर नागरिकांचा विश्वास आहे
- विविध प्रकल्पांमधील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणार

- गेल्या पाच वर्षांत कायापालट करणारे प्रकल्प केले
- देशातील खासगी उद्योगांची विकासात मोलाची भूमिका
- मुद्रा कर्ज योजनेमुळे अनेकांचे आयुष्य बदलले
- डिजीटल इंडियाचा लाभ संपूर्ण भारताला झाला
- 2014 ते 2019 पर्यंत खाद्य सुरक्षेवर भर दिला
- सागरमाला प्रकल्पामुळे जलमार्गांचा विकास होणार
- पायाभूत सुविधांमधून दळणवळण वाढविण्याचा प्रय़त्न
- पायाभूत सुविधांच्या विकासामुळे वाहतूक खर्च कमी झाला
- हवाई क्षेत्रात भारताला विकासाची मोठी संधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Finance Minister Nirmala Sitharaman presents union budget in Parliament