esakal | 'एकट्या महाराष्ट्रात देशातील 34% मृत्यू; केंद्रीय आरोग्य सचिवांनी व्यक्त केली चिंता

बोलून बातमी शोधा

rajesh bhushan

पत्रकार परिषदेत सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशातील सर्वाधिक संक्रमित 10 जिल्ह्यांमध्ये सात जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.

'एकट्या महाराष्ट्रात देशातील 34% मृत्यू; केंद्रीय आरोग्य सचिवांनी व्यक्त केली चिंता
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात सध्या पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावाने डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या संख्येने संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण संक्रमितांमध्ये महाराष्ट्र राज्यातील संक्रमितांची संख्या दिवसागणिक 60 टक्क्यांहून अधिक असल्याची परिस्थिती आकडेवारी दाखवत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत विदारक असून आता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशातील सर्वाधिक संक्रमित 10 जिल्ह्यांमध्ये सात जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. उर्वरित तीन कर्नाटक, छत्तीसगढ आणि दिल्ली राज्यांमधील जिल्हे आहेत. 

हेही वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याचा दागिना अन् पुरुषांना भन्नाट गिफ्ट

पंजाब आणि छत्तीसगढ राज्यामधील कोरोना मृतांची संख्या हे एक चिंतेचं कारण असल्याचंही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, सध्या देशातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांपैकी 58 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत तर एकूण देशातील मृतांपैकी 34 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.  

या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्वाधिक विचारलेल्या एका प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे. तो प्रश्न म्हणजे सर्वांनाच लस का दिली जात नाही? त्यांनी म्हटलं की, अनेकजण विचारतात की लसीकरण सर्वांसाठी का खुलं करण्यात आलं नाहीये? लसीकरण मोहिमेचे दोन मुख्य उद्देश आहेत - एक म्हणजे मृत्यू रोखणे आणि आरोग्यव्यवस्थेला संरक्षण पुरवणे. लस हवीय त्यांनी पुरवणं हा उद्देश नाहीये तर लसीची खरंच गरज आहे त्यांना ती उपलब्ध करुन देणे, हा उद्देश आहे.