
प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्षाचं वातावरण पहायला मिळालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुरुवारी सिव्हील लाईनच्या तीरथराम शाह हॉस्पिटल आणि सुश्रुत ट्रॉमा सेंटरवर जाऊन या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची भेट दिली तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
#WATCH Delhi: Union Home Minister Amit Shah meets and speaks to an injured Police personnel, who is admitted at Tirath Ram Shah Hospital.
These Police personnel were injured in the violence during the farmers' tractor rally on January 26th. pic.twitter.com/f0WsgOvSPP
— ANI (@ANI) January 28, 2021
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 63 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किसान गणतंत्र परेड काढली होती. नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून ते रद्दच केले जावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. हे कायदे बनवताना तसेच पारित करताना केंद्र सरकारने विरोधकांना तसेच शेतकऱ्यांना देखील विचारात घेतले नव्हते. तसेच त्यांच्याशी संवाद न साधता, आक्षेप न जाणून घेताच हे कायदे आवाजी मतदानाने संसदेत पारित केले होते. गेल्या दोन महिन्यांत सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या 10 फेऱ्या पार पडल्या असून अद्यापही तोडगा निघाला नाहीये. ऐन कडाक्याच्या थंडीत आणि पावसात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आतापर्यंत 150 हून अधिक शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत.
हेही वाचा - सरकारने डोळे का झाकलेत? काहीच का करत नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
या परेडदरम्यान आंदोलक आणि पोलिस यांच्यादरम्यान संघर्ष झालेला पहायला मिळाला. काही ठिकाणी आंदोलकांकडून बॅरिकेड्स तोडण्यात आले तर काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर प्रवेश करुन तिथे धार्मिक झेंडा फडकावला होता. या संघर्षात अनेक शेतकरी तसेच पोलिस देखील जखमी झाले होते. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे.
दिल्ली पोलिस कमिश्नर एस.एन. श्रीवास्तव यांनी बुधवारी म्हटलं की प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या संघर्षात 394 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यात झालेल्या हिंसेसाठी आतापर्यंत 19 लोकांना अटक केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी 25 हून अधिक FIR दाखल केले आहेत. काही पोलिस अधिकाऱ्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना ICU मध्ये देखील भरती केलं गेलं आहे.
Delhi: Union Home Minister Amit Shah meets injured Police personnel at Tirath Ram Shah Hospital. These Police personnel were injured in the violence during the farmers' tractor rally on January 26th. pic.twitter.com/VtDg7m3iFz
— ANI (@ANI) January 28, 2021
पुढे त्यांनी म्हटलं की, यातील आरोपींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजची मदत घेत आहेत. आतापर्यंत 19 लोकांची अटक आणि 50 लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सध्या सुरु आहे.