CAA : नागरिकत्व कायदा देशभर लागू; 'हे' राज्य ठरले पहिले

वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

या कायद्यामुळे केंद्र सरकार कुणाचेही नागरिकत्व हिसकावून घेणार नसून शेजारील मुस्लिम देशांतून येथे येणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होईल, असे केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्यावरून देशभर आंदोलने पेटली असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिसूचना शुक्रवारी रात्री जारी केली, यामुळे या कायद्याच्या तरतुदी देशभर लागू होतील. विशेष म्हणजे केरळ विधिमंडळाने या कायद्याला विरोध करणारा ठराव मंजूर केला असताना आज गुजरात विधिमंडळानेही या कायद्याच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केला. तर, उत्तर प्रदेश हा कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

" या कायद्यामुळे केंद्र सरकार कुणाचेही नागरिकत्व हिसकावून घेणार नसून शेजारील मुस्लिम देशांतून येथे येणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होईल, '' असे केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.

मंत्री होऊन गोव्याला गेला अन् एका मसाजने...

दरम्यान, भाजपवगळता बहुतांश राजकीय पक्षांनी या कायद्याच्याविरोधात भूमिका घेतली असून सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत सावध पवित्रा घेतला होता. आधी देशातील हिंसाचार थांबू द्या नंतरच आम्ही या कायद्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी संसदेने या विधेयकाला मान्यता दिल्यानंतर बारा डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याच्यावर मान्यतेची मोहोर उमटविली होती. देशातील बारा राज्यांनी हा कायदा लागू करण्यास विरोध दर्शविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union home ministry issues notification CAA comes into effect