मराठा आरक्षणासाठी रामदास आठवलेही सरसावले

टीम ई सकाळ
Friday, 5 February 2021

राज्यसभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मराठा आरक्षणाबाबत मत मांडलं आहे. मराठा समाज महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी करत आहे असं रामदास आठवले राज्यसभेत म्हणाले.

नवी दिल्ली - मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असून त्यावर आज सुनावणी झाली. आता या प्रकरणावर पुढची सुनावणी 8 मार्चला सुरू होणार आहे. दरम्यान, राज्यसभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मराठा आरक्षणाबाबत मत मांडलं आहे. मराठा समाज महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी करत आहे असं रामदास आठवले राज्यसभेत म्हणाले.

रामदास आठवलेंनी म्हटलं की, महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट, राजस्थानात राजपूत आणि उत्तर प्रदेशात ठाकुरांना  आरक्षण हवं आहे. जसं 10 टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना दिलं तसचं त्यांनाही आरक्षण द्यायला हवं असंही आठवले म्हणाले. 

मराठा आरक्षणावरून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. सुनावणीमध्ये प्रत्यक्ष सुनावणीबाबतचा निर्णय होणार होता. आणि आता पुढील सुनावणी 8 मार्चपासून सुरु होणार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने सुनावणीबाबतचं वेळापत्रक ठरवून दिलं आहे. मराठा आरक्षणावरील सुनावणी 8 मार्चला सुरु होऊन 18 मार्चला ती संपेल. या 10 दिवसांच्या कालावधीत विभागवार 3 दिवस याचिकाकर्ते तर 4 दिवसांचा वेळ राज्य सरकारला दिला आहे. ही 18 मार्चला सुनावणी पूर्ण होईल.

हे वाचा - कृषी कायद्यांमध्ये काळं काय आहे? मला शेतकऱ्यांनी पटवून द्यावं- कृषीमंत्री

प्रत्यक्ष सुनावणी की ऑनलाईन?
प्रत्यक्ष सुनावणी किंवा व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग जी त्या दिवशीची परिस्थिती असेल, त्यानुसार, सुनावणी केली जाईल. म्हणजे सुनावणीतील सगळेच दिवस प्रत्यक्षात सुनावणी होईलच, असं सांगता येत नाही. मात्र ही सुनावणी नियमित होईल, अशी आशा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Min Athawale talks about maratha reservation in rajya sabha