रवींद्रनाथ टागोर यांचा रंग सावळा; केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rabindranath tagores

टागोर यांच्या वर्णाबद्दलचे हे विधान अत्यंत असंबद्ध आणि मूर्खपणाचे होते, असा नाराजीचा सूर पश्चिम बंगालमध्ये उमटला आहे.

रवींद्रनाथ टागोर यांचा रंग सावळा; केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त विधान

कोलकता - ‘‘रवींद्रनाथ टागोर यांचा रंग कुटुंबातील अन्य सदस्यांपेक्षा सावळा होता. म्हणूनच त्यांची आई त्यांना कडेवर घेण्यास उत्सुक नसे,’ या वादग्रस्त विधानाने केंद्रातील शिक्षण राज्य मंत्री सुभाष सरकार हे अडचणीत आले आहेत. शांतीनिकेतन बुधवारी (ता.१८) झालेल्या विश्‍व भारती संमेलनात सरकार यांनी केलेल्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

टागोर यांच्या वर्णाबद्दलचे हे विधान अत्यंत असंबद्ध आणि मूर्खपणाचे होते, असा नाराजीचा सूर पश्चिम बंगालमध्ये उमटला आहे. केंद्रीय मंत्री झाल्यापासून सरकार यांनी काल प्रथमच शांतीनिकेतनला भेट दिली. तेथे तीन तासाच्या व्याख्यानात त्यांनी त्वचेच्या रंगाबद्दल माहिती देताना ‘गोरा रंग दोन प्रकारचा असतो. एक किंचित पिवळसर गोरा व दुसरा लालवाला गोरेपणा. रवींद्रनाथ टागोर यांची त्वचा लालवाली होती. म्हणूनच रवींद्रनाथ टागोर त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींपेक्षा सावळे दिसत असत, असे ते म्हणाले.

हेही वाचा: देशातील कोट्यवधी नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित

टागोरप्रेमी व त्यांची माहिती असणाऱ्यांनी सरकार यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. लेखक व विश्‍वभारतीचे माजी प्राध्‍यापक अमित्र सुदन भट्टाचार्य म्हणाले की, माझे वडील बिजन भट्टाचार्य यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर १९३१ पासून दहा वर्षे काम केले होते. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार टागोर रंगाने उजळ आणि देखणे होते. मंत्र्यांनी त्यांच्याबद्दल असे विधान करण्यामागे काय कारण आहे, असा सवाल भट्टाचार्य यांनी केला.

‘रंगाबद्दल पुरावे आहेत’

दरम्यान, टागोर यांच्या रंगाबाबत केलेल्या विधानाबाबत सरकार ठाम आहेत. त्यांच्या त्वचेच्या वर्ण सिद्ध करणारे अनेक कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Union Minister Comments On Rabindranath Tagore Complexion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rabindranath Tagore