Kashmiri Pandit : काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराचा पश्चाताप होईल! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे वक्तव्य

Union Minister Jitendra Singh : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर वक्तव्य करत म्हटले की, एक दिवस बहुसंख्य समुदायाला याचा पश्चात्ताप होईल. त्यांनी काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचा सांस्कृतिक वारसा महत्त्वाचा असल्याचे व्यक्त केले.
Union Minister Jitendra Singh
Union Minister Jitendra Singhsakal
Updated on: 

जम्मू : काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागण्याचा खोऱ्यातील बहुसंख्य समुदायाला एकेदिवशी पश्चात्ताप होईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज केले. काश्मिरी पंडितांशिवाय काश्मीर खोरे अपूर्ण आहे, असेही ते म्हणाले. येथील गांधी स्मृती महाविद्यालयात मात सरस्वती प्रेक्षागृहाचे उद्‌घाटन सिंह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com