
मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीच्या सीमांवर गेले अनेक महिने अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी 'मवाली' अशा शब्दात हिणवले आहे.
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीच्या सीमांवर गेले अनेक महिने अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी 'मवाली' अशा शब्दात हिणवले आहे. लेखी यांना संसदेवरील शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी “त्यांना शेतकरी का म्हणता, ते मवाली आहेत मवाली, असे त्वेषाने सांगितले. (Union Minister Meenakshi Lekhi They are not farmers they are hooligans farmer protest farm law)
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांपैकी २०० शेतकऱ्यांनी 22 जूलैपासून जंतरमंतरवर प्रतिरूप संसद आंदोलन सुरु केले. त्याच्या पहिल्याच दिवशी लेखी यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांकडून असे वक्तव्य आल्याने त्याचे पडसाद उद्याच्या प्रतिरूप संसदेत उमटणार हे निश्चित मानले जात आहे. लेखी म्हणाल्या, शेतकरी जे करत आहेत ते कायद्याच्या भाषेत गुन्हेगारी कृत्य या स्वरूपात मोडते. २६ जानेवारीला जो हिंसाचार झाला तो गंभीर गुन्हा होता. दुर्दैवाने विरोधी पक्ष या प्रकारांना उत्तेजन देत आहे.
आताच मंत्री बनलेल्या मीनाक्षी लेखी यांची जीभ घसरली तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या या भाषेला त्यांच्या पातळीवर न जाता संयमाने उत्तर दिले आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले, की मवाली नाही शेतकरी आहेत. देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आपल्या मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करत आहेत. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असतो.
मीनाक्षी लेखी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. माझं वक्तव्य 26 जानेवारीला झालेल्या हिंसेप्रकरणी होते. यासंदर्भात मी मवाली हा शब्द वापरला. शेतकरी अशाप्रकारचे कृत्य करु शकत नाहीत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. तरीही, माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझं वक्तव्य मागे घेते, असं लेखी म्हणाल्या आहेत. दरम्याम, लेखी यांच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. त्यांनी माफी मागावी असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.