esakal | नारायण राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

sakal_logo
By
नामदेव कुंभार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या ड्रायव्हरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यानंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. वैद्यकीय सुट्टीवर असतानाही निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या ड्रायव्हरचं नाव अशोक कुमार वर्मा असं आहे. ते उत्तर प्रदेशातील राज्य स्थावर विभागात चालक म्हणून कार्यरत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लखनौ दौऱ्यावर असताना अशोक कुमार यांची ड्यूटी लावण्यात आली होती. ते वैद्यकीय रजेवर असतानाही त्यांना कामावर बोलवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबियांनी संबधित आधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लखनौ दौऱ्यावर असताना अशोक कुमार यांची ड्यूटी लावण्यात आली होती. कामावर असतानाच अशोककुमार यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांच्या मृत्यू झाला. अशोक कुमार वर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलिस आधिकारी राघवेंद्र मिश्र म्हणाले की, अशोक कुमार वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कुटुंबाने हत्येचा आरोप केला असून तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई केली जात आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. कारण काहीही असो, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

हेही वाचा: नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही?- राज ठाकरे

मागील काही दिवसांपासून अशोक कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे ते वैद्यकीय रजेवर होते. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आल्यानंतर त्यांची रजा रद्द करण्यात आली. वैद्यकीय सुट्टीवर असतानाही निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलववण्यात आलं. स्थावर विभागातील अधिकारी अमरीश श्रीवास्तव यांना अशोक कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती होते. त्यानंतरही कामावर हजर राहण्यास सांगितले. तसेच त्यांनी निलंबित करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे अशोक कुमार यांना कामावर जावं लागलं, असा आरोप कुटूंबियांनी केला आहे.

loading image
go to top