"आम्हाला शिवराय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच समजले" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

"आम्हाला शिवराय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच समजले"

sakal_logo
By
सुधीर काकडे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आज राज्यावर शोककळा पसरली आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहन्यात येते आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या व्यक्त केल्या आहेत. वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे आहे असे म्हणत नितीन गडकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.

नितीन गडकरी यांनी यावेळी "अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे आहे" असे सांगितले.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि अवघ्या महाराष्ट्राला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती. आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात अलं म्हणत नितीन गडकरींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय

आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

loading image
go to top