केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याची माहिती स्वत: नितिन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याची माहिती स्वत: नितिन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. अशक्तपणा वाटल्याने चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याचं नितिन गडकरी म्हणाले.

ट्विटरवरून नितिन गडकरींनी सांगितलं की,  म्हणाले की, काल मला थोडा अशक्तपणा जाणवत होता. डॉक्टरांकडून याबाबत सल्ला घेतला. त्यानंतर कोरोना चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सर्वांचे आशिर्वाद आणि प्रार्थनांमुळे ठीक आहे. स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. 

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दोन ट्विटमधून माहिती देताना संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, माझ्या संपर्कात आलेल्यांना विनंती आहे की काळजी घ्या आणि कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करा. सुरक्षित रहा.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनाआधी अनेक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना झालेल्या खासदारांना अधिवेशनात प्रवेश दिला जाणार नाही. तसंच अधिवेशनावेळीही सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union minister nitin gadkari tested corona positive informed from tweet