esakal | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान ICU मध्ये; मुलाने लिहिलं भावनिक पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

ramvilas paswan

लोक जनशक्ती पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात आयसीयुमध्ये हलवण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान ICU मध्ये; मुलाने लिहिलं भावनिक पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - लोक जनशक्ती पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात आयसीयुमध्ये हलवण्यात आलं आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानने त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. वडिलांची प्रकृती बिघडली असताना बिहारमध्ये येणं शक्य नसल्याचं चिराग पासवान यांनी सांगितलं आहे. त्यांनी एक पत्र पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना लिहिलं आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी सहभागी होणं शक्य नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. 

चिराग पासवान यांनी म्हटलं की, गेल्या तीन आठवड्यापासून रामविलास पासवान दिल्लीतील एका रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर सध्या आयसीयुमध्ये उपचार सुरू असल्यानं चिराग यांनी आपल्याला बिहारला येता येणार नाही असं म्हटलं आहे. जागावाटपावरून त्यांची कोणाशी चर्चा झालेली नाही असंही सांगितलं आहे. कोरोनाच्या संकटात लोकांना राशन वेळेवर मिळावं यासाठी वडिलांनी नियमित तपासणी पुढे ढकलली. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने गेल्या तीन आठवड्यापासून उपचार सुरु आहेत. 

एक मुलगा म्हणून पत्र लिहिताना चिराग यांनी म्हटलं की, वडिलांना रुग्णालयात पाहून खूप विचलित झालो आहे. वडिलांनी अनेकदा मला पटना जाण्यास सांगितलं पण मुलगा म्हणून त्यांना आयसीयूमध्ये सोडून जाण शक्य नाही. आज त्यांना माझी गरज आहे तर सोबत रहायला हवं. नाहीतर मी कधीच स्वत:ला माफ करू शकणार नाही. 

हे वाचा - देशात 17 वर्षात लाखो कोटींचा भ्रष्टाचार; नावे उघड झाल्यास होणार राजकीय उलथापालथ

पक्षाचा अध्यक्ष असल्याच्या नात्याने त्या सहकाऱ्यांचीसुद्धा चिंता वाटते ज्यांनी बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट साठी आयुष्य वाहून घेतलं आहे. मी हे स्पष्ट करतो की आतापर्यंत इतर सहकारी पक्षांकडून बिहारच्या भविष्याबाबत किंवा जागा वाटपाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही.