Mahua Moitra : ‘गोमांस नेण्यासाठी मंत्र्यांनी दिला पास’

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी भारत-बांगलादेश सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला परवाना (पास) दिल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला आहे.
Mahua Moitra
Mahua Moitrasakal
Updated on

कोलकता : केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी भारत-बांगलादेश सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला परवाना (पास) दिल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून संबंधित व्यक्तीला पास दिल्याचा खुलासा करीत ठाकूर यांनी आरोप फेटाळला आहे.

ठाकूर यांचे हस्ताक्षर असलेल्या या कथित पासचे छायाचित्र मोईत्रा यांनी ‘एक्स’वर प्रसिद्ध केले आहे. २ जुलैला दिलेल्या हा पास सीमा सुरक्षा दलाच्या ८५ व्या तुकडीच्या परवानगीसाठी दिला होता. हकीमपूरमधील जियारुल गाझी याला तीन किलो गोमांस नेण्याची परवानगी या पासद्वारे दिली होती, असा आरोप ठाकूर यांच्यावर मोईत्रांनी केला आहे.

अशा कृत्याने गुंडगिरीला प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी म्हटले आहे. हा आरोप निराधार असल्याचे सांगत ठाकूर म्हणाले की, महुआ मोईत्रा यांनी असे बिनबुडाचे आरोप करण्याची सवय लावून घेतली आहे. सीमेजवळ राहणाऱ्या ज्या व्यक्तींना सीमा ओलांडण्याची आवश्यकता आहे, त्यांना परवाना दिला जाईल, असे मी डिसेंबरमध्ये जाहीर केले होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com