CAA: देशात 7 दिवसांत लागू होणार नागरिकत्व सुधारणा कायदा; केंद्रीय मंत्र्याची 'गॅरंटी'

Citizenship Amendment Act CAA implemented India: केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी दावा केलाय की, नागरिकत्व सुधारणा कायदा Citizenship (Amendment) Act (CAA) देशात सात दिवसांच्या आत लागू केला जाईल.
Citizenship Amendment Act CAA implemented India
Citizenship Amendment Act CAA implemented IndiaSakal
Updated on

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी दावा केलाय की, नागरिकत्व सुधारणा कायदा Citizenship (Amendment) Act (CAA) देशात सात दिवसांच्या आत लागू केला जाईल. ते म्हणाले की, मी तुम्हाला गॅरंटी देतो की येत्या सात दिवसात केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए लागू होईल.(Union Minister Shantanu Thakur has claimed that the Citizenship Amendment Act CAA implemented India within next seven days)

शंतनू ठाकूर हे बंगालमधील एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. शंतनू ठाकूर हे बेनगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. ते म्हणाले की, अमित शाह यांनी सीएए लागू करणार असल्याचं सांगितलं आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अमित शहा यांनी म्हटलं होतं की, देशात सीएए लागू होणार, त्याला कोणीही थांबवू शकत नाही.

Citizenship Amendment Act CAA implemented India
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणार CAA? अधिकाऱ्याने दिली महत्वाची माहिती

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएएला विरोध केला आहे. राज्यात सीएए लागू होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, अमित शहा यांनी तृणमूल सरकारवर भ्रष्टाचार, हिंसाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. २०२६ मध्ये तृणमूल सरकार येऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी लोकांना केले होते.

Citizenship Amendment Act CAA implemented India
Amit Shah : ''CAA ला कोणीही रोखू शकत नाही'' पश्चिम बंगालमध्ये जावून अमित शाहांनी स्पष्ट केली भूमिका

सीएए संसदेच्या दोन्ही सभागृहात २०१९ मध्ये मंजूर झाले होते. त्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात देशभरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. विरोधकांनी सीएएला विरोध केला आहे. पण, भाजपकडून हा प्रतिष्ठेचा मुद्दा करण्यात आला आहे. सीएएचे नियम तयार झाले असून लोकसभेच्या आधी ते जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएएचे ऑनलाईन पोर्टल तयार असून सर्व प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अर्जदाराला कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात कोणत्या वर्षी प्रवेश केला हे जाहीर करावं लागणार आहे. या कायद्यामुळे पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे. मात्र, सीएए कायदा खरंच सात दिवसांत लागू होईल का, हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com