केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

देशात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून रिकव्हरी रेटही वाढला आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून रिकव्हरी रेटही वाढला आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती स्मृती इराणी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

स्मृती इराणी यांनी ट्विटरवर म्हटलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

स्मृती इराणी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. निवडणूक प्रचार मोहिमेत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. एका रॅलीत भाषणावेळी त्या म्हणाल्या होत्या की, एक वेळ होती की दिल्लीतून 100 रुपये दिले जायचे पण ते बिहारला पोहोचेपर्यंत 5 रुपये व्हायचे. आज केंद्रात नरेंद्र मोदी आणि बिहारमध्ये नितिश कुमार यांच्या सरकारमध्ये 100 रुपये आले की 100 रुपये मिळतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union minister smriti irani tested corona positive