Live Updates - केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात; पत्नीसह सेक्रेटरीचा मृत्यू

टीम ई सकाळ
Monday, 11 January 2021

केंद्रीय मंत्री  श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी विजया श्रीपाद नाईक हे येल्लापूरहून गोकर्णला येत असताना गाडीला अपघात झाला.

बेंगळुरु - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीला कर्नाटकमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला इथं अपघात झाला. 

Updates - 

  • केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात पत्नीसह सेक्रेटरीचा मृत्यू
  • हिल्लूर होसाकंबी गावाजवळ सोमवारी रात्री गाडी पलटी झाली.
  • श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापतझाली होती. खासगी रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
  • अपघातात नाईक यांच्या पत्नीसह त्यांच्या सेक्रेटरीचासुद्धा मृत्यू झाला आहे.
  • श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केंद्रीय मंत्री  श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी विजया श्रीपाद नाईक हे येल्लापूरहून गोकर्णला येत असताना गाडीला अपघात झाला. यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी गंभीर झाल्या होत्या. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. श्रीपाद नाईक यांच्यावर उपचारासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेश मोदींनी मुख्यमंत्री सावंत यांना दिले असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. 

हे वाचा - आज दिवसभरात - पुणे 'अपघात'वार ते लसीकरणाबाबत मोदींचे भाषण; देश-विदेशातील बातम्या एका क्लिकवर

कोण आहेत श्रीपाद नाईक
श्रीपाद नाईक हे मूळचे गोव्याचे असून, उत्तर गोव्यातील अडपै गावात त्यांचा जन्म झाला. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे ते गेल्या 25 वर्षांपासून प्रतिनिधित्व् करत आहेत. 1999च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये ते आयूष खात्याचे राज्य मंत्री असून, त्यांच्याकडे या खात्याचा स्वतंत्र कार्यभार आहे. केंद्रात त्यांनी यापूर्वी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union minister sripad naik injured in car accident in karnataka