केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा तिच्या आई-वडिलांनी आरोप करत तक्रार दाखल केलीय. या प्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आलीय.
POCSO case filed against central ministers son after complaint by minors family

POCSO case filed against central ministers son after complaint by minors family

Esakal

Updated on

केंद्रीय मंत्री बंदी संजय यांचा मुलगा बंदी साई भगीरथ याला रविवारी तेलंगनाच्या हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. बंदी यांचा मुलगा संजय याच्या विरोधात १७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. ८ मे रोजी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला भगीरथने चौकशीवेळी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचा दावा केला गेला. मात्र पोलिसांनी सांगितलं की त्याला अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com