UPSC पूर्वपरीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

यूपीएससीच्या (Union Public Service Commission Exams) परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वाच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

नवी दिल्ली- यूपीएससीच्या (Union Public Service Commission Exams) परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वाच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 20 उमेदवारांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने परीक्षा स्थगित करण्यास नकार दिला. 

काँग्रेसने मागावी जनतेची माफी; बाबरी निकालानंतर योगी आदित्यनाथांची मागणी

2020 ची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. परीक्षा ठरवलेल्या तारखेलाच होईल असं सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. कोरोना महामारीमुळे सध्याची स्थिती वाईट आहे. हजारो विद्यार्थी यूपीएससी पूर्वपरीक्षा देत असतात. न्यायालयाने संभाव्य धोका लक्षात घेऊन 2020 आणि 2021 च्या परीक्षा एकाचवेळी घ्याव्यात असं याचिकेत म्हणण्यात आलं होतं. 

परीक्षा पुढे ढकलल्यास याचा वाईट परिणाम होईल. त्यामुळे परीक्षा ठरल्यावेळीच घेतल्या जाव्यात अशी टिपण्णी न्यायालयाने केली आहे. ज्या उमेदवारांचा हा शेवटचा प्रयत्न आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परिक्षेला उपस्थित राहता येणार नाही, अशा उमेदवारांबाबत न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने भाष्य केलं. अशा उमेदवारांना शेवटची संधी देण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, असं खंडपीठाने म्हटलं आहे. 

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात हा काळा दिवस 

यूपीएससीचे उत्तर

परीक्षा घेण्यास आधीच खूप उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया यूपीएससीने दिली आहे. यूपीएससी 2020 पूर्वपरीक्षा नियोजित वेळेपेक्षा उशिरा होणार आहे. याचा परिणाम 2021 च्या परीक्षांवरही होणार आहे. 2020 यूपीएससी पूर्वीपरीक्षा 4 ऑक्टोंबर रोजी घेतली जाणार आहे, तर 2021 यूपीएससी पूर्वपरीक्षा 27 जून रोजी होण्याची शक्यता आहे. यूपीएससी परीक्षांचे अंतिम निकाल पूर्वपरीक्षेआधी लावले जातात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Public Service Commission Exams held in decided date said sc