'जेएनयू'वर पुन्हा डाव्यांचे वर्चस्व; 'अभाविप'चा सुफडा साफ

वृत्तसंस्था
Wednesday, 18 September 2019

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत चारही जागांवर डाव्या आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. आयिशी घोष हिची अध्यक्षपदी निवड झाली.

नवी दिल्ली ः जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत चारही जागांवर डाव्या आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. आयिशी घोष हिची अध्यक्षपदी निवड झाली.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी (ता. 17) उशिरा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या डाव्या संघटनेच्या संयुक्त आघाडीने या निवडणुकीत वर्चस्व मिळविले.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहचिटणीस या पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United Left candidates sweep JNUSU elections once again