''उन्नाव प्रकरणातील आरोपींचा भाजपशी संबंध''

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

उन्नाव : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींचा भाजपशी संबंध असल्याची शंका उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली आहे. उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  

त्या म्हणाल्या, "गेले वर्षभर उन्नाव प्रकरणातील आरोपी पीडितेच्या कुटुंबियांना धमकी देत होते त्यांचा छळ करत होते. मी ऐकलय की या आरोपींचा भाजपशी संबंध आहे, त्यामुळेच त्यांचा बचाव केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही.'' 

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आले होते. त्यानंतर ती 90 टक्के भाजली होती. काल मध्यरात्री  तिचा दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रयांका गांधी यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेत तिचे सांत्वन केले. 

''उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना या काळाशी लढण्यात हिंमत मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण तिला न्याय देऊ शकलो नाही हे आपल्या सर्वांचे अपयश आहे,'' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच तिला सुरक्षा का देण्यात आली नव्हती असा प्रश्नही त्यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnao culprits have some BJP connection says Priyanka Gandhi