एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची पुन्हा दादागिरी! क्रू मेंबरला शिवीगाळ, मारहाण : Air India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

Air India: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची पुन्हा दादागिरी! क्रू मेंबरला शिवीगाळ, मारहाण

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा प्रवाशाकडून दादागिरीचा प्रकार दिसून आला आहे. Flight AI882 या विमानात हा प्रकार घडला. प्रवाशानं विमानाच्या क्रू मेंबबरला शिविगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली एअरपोर्टवर विमान लँड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Unruly Passenger abuses assaults Air India crew member Onboard AI Flight)

सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीकडे जाणाऱ्या एका विमानात हा प्रकार घडला जो मंगळवारी समोर आला आहे. या विमानातील प्रवाशानं एका क्रू मेंबबरला मारहाण केली. यानंतर दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानं प्रवाशाचं भडकाऊ आणि चिडेलेल्या अस्थेत क्रू मेंमबरशी भिडला.

दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. DGCIकडे या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे, असं एअर इंडियानं काढलेल्या पत्रात म्हटलं आहे. कंपनीनं गोधळ घालणाऱ्या या प्रवाशाची ओळख उघड केलेली नाही.

गेल्या दोन महिन्यात एअर इंडियाच्या विमानात घडलेली ही दुसरी घटना आहे. १० एप्रिल रोजी दिल्ली-लंडन विमानात असाच प्रकार घडला होता. यामध्ये एका प्रवाशानं एअर इंडियाच्या दोन महिला केबिन क्रू सदस्यांना हातान मारहाण केली होती. या प्रवाशावर विमान कंपनीनं दोन वर्षांसाठी प्रवासबंदी घेतली होती.

टॅग्स :Desh newsAir India