
...तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदू शकत नाही; अब्दुल्लांचा केंद्रावर हल्लाबोल
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत तुम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेची मन जिंकत नाही तोपर्यंत इथं शांतात नांदणार नाही, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. (Until then there can be no peace in Jammu and Kashmir Farooq Abdullah slams on central govt)
काश्मीरमध्ये दरदिवशी हत्या होत आहेत, असा एकही दिवस नाही काश्मीरमध्ये मृत्यू होत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. लष्कर कायम जनतेच्या मनावर राज्य करु शकत नाही. पण तिथं प्रेमाचीच गरज आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवं.
हेही वाचा: गायक मुसेवाला हत्या प्रकरणाची होणार न्यायालयीन चौकशी? सरकारचं हायकोर्टाला पत्र
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी नुकतंच सांगितलं की, गेल्या पाच महिन्यात खोऱ्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचे २६ दहशतवादी ठार झाले आहेत. यावर्षी २६ पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती विजयकुमार यांनी दिली. जेव्हा कुपवाड्यात तोयबाच्या दहशतद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ही माहिती दिली होती.
Web Title: Until Then There Can Be No Peace In Jammu And Kashmir Farooq Abdullah Slams On Central Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..