Agra Expressway वर भीषण अपघात; बस-डंपरच्या धडकेत 4 ठार, 45 हून अधिक जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agra Expressway Accident

इटावा येथील आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण रस्ता अपघात झाला आहे.

Agra Expressway वर भीषण अपघात; बस-डंपरच्या धडकेत 4 ठार, 45 हून अधिक जण जखमी

उत्तर प्रदेशच्या इटावा (Etawah Uttar Pradesh) येथील आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण रस्ता अपघात (Agra Expressway Accident) झालाय. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. ही बस गोरखपूरहून अजमेरला जात असताना डंपरला धडकली, असं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं असून त्यांनी बचावकार्य सुरू केलंय. डंपर वाळूनं भरल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Kerala : 'मी त्यांची नियुक्ती केलीय'; संविधानाचा दाखला देत राज्यपालांनी मंत्र्यांना फटकारलं

एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. हा अपघात कसा झाला, त्यामागील कारणांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. बसमध्ये 50 हून अधिक लोक होते, असंही सांगण्यात येत आहे. जिल्ह्याच्या एडीएमनं सांगितलं की, बस स्लीपर होती. जखमींना सैफई येथील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा: Bilkis Bano Case : PM मोदी-अमित शहांनी सैतानाला बाहेर सोडून दिलंय; TMC खासदाराचा गंभीर आरोप

वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याचं आश्वासन दिलंय. जखमींची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या महिन्याच्या सुरुवातीला कानपूरमध्ये एका ट्रकनं उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या लोडरला धडक दिली होती. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी दहा जण जखमी झाले. गाझियाबादमध्ये 25 मे रोजी भीषण अपघात झाला होता. इथं दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर एक ट्रेन उलटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. तर, रिवा इथं शनिवारी एक भीषण रस्ता अपघात झाला होता. बस आणि ट्रॉली यांच्यात झालेल्या धडकेत 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच वेळी 30 हून अधिक लोक जखमी झाले होते.