UP : यूपीमध्ये तब्बल 80% नेत्यांचे डिपॉझिट जप्त; काँग्रेस सगळ्यात पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Assembly Election

यूपीमध्ये तब्बल 80% नेत्यांचे डिपॉझिट जप्त; काँग्रेस सगळ्यात पुढे

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूका (Assembly Election 2022) झाल्या. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला तर भाजपने चार राज्यात ऐतिहासीक विजय मिळवला. दरम्यान या नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने लढवलेल्या 399 जागांपैकी 387 जागांवर आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) देखील गमावली आहे. पक्षाला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत.

जवळपास सर्व जागा लढवून काँग्रेसला राज्यातील एकूण मतांपैकी फक्त 2.4% मते मिळाली, जी आरएलडीने 33 जागा लढवूण मिळवलेल्या 2.9% मतांपेक्षा देखील कमी आहेत. इतर प्रमुख पक्षांपैकी, बसपने सर्व 403 जागा लढवून 290 जागांवर डिपॉझिट गमावले. अगदी मोठा विजय मिळवलेल्या भाजपने देखील 376 जागांपैकी तीन जागांवर त्यांचे डिपॉझिट गमावले.

विशेष म्हणजे, भाजपचे सहकारी पक्ष अपना दल (सोनीलाल) आणि निषाद यांनी आपापसात लढवलेल्या 27 जागांपैकी एकाही जागेवर त्यांची अनामत रक्कम गमावली नाही, यामुळे त्यांना लढण्यासाठी ज्यात त्यांची जिंकण्याची शक्यता होती फक्त त्याच जागा देण्यात आल्या असल्याचे दिसून येत.

हेही वाचा: पराभवानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही यूपीत आमचा पक्ष.."

याउलट, SP चे जोडीदार SBSP आणि अपना दल (कामेरवाडी) यांनी त्यांच्या एकत्रित 25 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांचे डिपॉझिट गमावले आहे. अगदी ज्येष्ठ मित्रपक्ष आरएलडीने लढवलेल्या 33 जागांपैकी तीन जागांवर आपले डिपॉझिट गमावले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.यूपीमधील 4,442 उमेदवारांपेकी 3,522 किंवा जवळपास ८०% उमेद्वारांनी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

हेही वाचा: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पाहा देशातील पेट्रोल, डिझेलचे दर

Web Title: Up Assembly Election 80 Percent Of All Candidates With 97 Of Congress Lost Their Deposits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpUttar PradeshCongress
go to top