पराभवानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही यूपीत आमचा पक्ष.." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray

पराभवानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही यूपीत आमचा पक्ष.."

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आले असून, चार राज्यांमध्ये भाजपाला तर एका ठिकाणी आम आदमी पार्टीला यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशच्या निकालानंतर (UP Election Result) अडीचशेच्यावर जागा जिंकत भाजपा (BJP) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.तर, गोवा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. युपीत देखील शिवसेनाच्या वाट्याला अपयश आलं आहे. या पराभवानंतर मंत्री आदित्य ठाकरे विजयी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

या विधानसभा निवडणूकीत शिवसेना राष्ट्रवादीसोबतच बहुजन समाज पार्टी (BSP) आणि एमआयएम (AIIMIM) या पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या निवडणुकीत लढले त्यांचं देखील मी हिमतीने ताकदीने लढले मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जे निकाल आहेत सर्वांच्या डोळ्यासमोर आहेतच. पण कुठेही नैराश्याचं वातावरण नाही. आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने तिथे लढलो. बाहेर प्रचाराला गेलो. ही सुरुवात आहे असे त्यांनी सांगितलं.

पुढे बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीसह विजयी झालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. आम्ही निवडणूकीचा निकाल सकारात्मक घेत आहोत. आम्ही यूपीमध्ये आमचा पक्ष वाढवू आणि 5 वर्षानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. तसेच या निकालाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 'लोकशाहीत जनतेचे मत सर्वोच्च..'; पराभवानंतर प्रियांका गांधींची प्रतिक्रीया

हेही वाचा: Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी गोव्याचा दौरा करत पक्षाचा प्रचार केला होता, त्या सर्व मतदारसंघात शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे, इतकेच नाही तर चारही उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

Web Title: Election Results Aditya Thackeray Says We Will Expand Our Party Base In Up And Will See Good Results

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..