लखनऊ : उत्तर प्रदेशात उघडकीस आलेल्या छांगूर बाबा धर्मांतर रॅकेट (Changur Baba Conversion Racket) प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी छांगूर बाबा आणि त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हे दोघे UP ATS (UP Anti-Terrorist Squad) च्या रिमांडमध्ये असून, अजून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या रॅकेटशी संबंधित एका पीडित मुलीने या अमानवी कृत्यांचा धक्कादायक खुलासा केला आहे.