'हम निकल पडे...' PM-CM यांच्यातील असा दोस्ताना तुम्ही पाहिला नसेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'हम निकल पडे...' CM योगींसोबत PM मोदींचा 'दोस्ताना'

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर करताना एक कवितासुद्धा कॅप्शनला टाकली आहे.

'हम निकल पडे...' CM योगींसोबत PM मोदींचा 'दोस्ताना'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. ५६ व्या डीजीपी आयजीपी परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांनी मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदींनी योगींच्या खांद्यावर हात टाकल्याचं दिसत आहे. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे हे फोटो राजभवनाच्या इमारतीतील आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर करताना एक कवितासुद्धा कॅप्शनला टाकली आहे. आम्ही प्रतिज्ञा घेऊन निघालो आहे. आमचं तन-मन अर्पण केलंय, नवा सूर्य उगवण्याची आकांक्षा आहे, आकाशापेक्षा उंच जायचंय, एक नवा भारत निर्माण करायचा आहे असाच काहीसा त्या कवितेचा भावार्थ आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटच्या कॅप्शनमध्ये ‘हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊंचा जाना है, एक भारत नया बनाना है.’ अशी कविता टाकली आहे. सोबत दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये समोरून तर एका फोटोत दोघेही पाठमोरे दिसत आहेत. फोटोमध्ये मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात टाकल्याचं दिसतंय. हे चित्र म्हणजे राज्याची जबाबदारी योगींच्याच खांद्यावर असेल हेच सांगण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा: मोदींचं मन मोठं, कायदे बनतील-पुन्हा येतील - साक्षी महाराज

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री अमित शहा हेसुद्धा सातत्यानं राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याआधी मोदींनी राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले होते. तर अमित शहा यांनी अनेक शहरांमध्ये रॅली काढली होती.

loading image
go to top