

CM Yogi Issues Warning Against Fuel Hoarding and Black Marketing
esakal
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये आगामी सण-उत्सव आणि पोलीस भरती परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः इंधन आणि गॅसच्या उपलब्धतेबाबत अफवा पसरवून काळाबाजार करणाऱ्यांना त्यांनी कडक इशारा दिला आहे.
मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा व सुव्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा आढावा घेतला. "राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.