Kaushambi Lover Kills Girlfriend : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलीये. पैनसा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहब्बतपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि तिचा मृतदेह यमुना नदीत (Yamuna River) फेकून दिला. कारण, ती त्याच्या लग्नात अडथळा ठरत होती. मात्र, अखेर मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे हा गुन्हा उघडकीस आला.