भाजपचा जाहीरनामा म्हणजे केवळ फुकाची हवा; मायावतींचा हल्लबोल

बसपाच युपीला खड्डे, हिंसाचार, दंगलमुक्त बनवू शकते; मायावतींचा जाहीरनामा
mayavati
mayavatiesakal
Summary

बसपाच युपीला खड्डे, हिंसाचार, दंगलमुक्त बनवू शकते; मायावतींचा जाहीरनामा

सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. (Assembly election 2022) दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात भाजपसह इतर पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. (UP Election 2022) फुकाची हवा आणि ढोंगी असणार हा जाहीरनामा असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशला खड्डे, हिंसाचार, दंगलमुक्त बनवायचे असल्यास बसपाचे सरकार येणे आवश्यक आहे. रोजगारासह विकास करण्यासाठी फक्त बसपाच हा एकच पक्ष सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

mayavati
UP Election 2022 : ‘लव्ह जिहादसाठी १० वर्षांची शिक्षा’; भाजपचा जाहीरनामा

प्रसिद्धीपत्रकात बसपने (BSP) म्हटलंय, पुन्हा विरोधी पक्षाच्या या जाहिरनाम्याने फुकाची हवा आणि आश्वासने देऊन राज्यातील जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधारी भाजप (BJP) सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता या सरकारला धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. (Mayawati)

राज्यातील जनतेने हे लक्षात घ्यावे की केवळ बसपाच राज्याला खड्डे, हिंसाचार आणि दंगलीपासून मुक्त करू शकते. बसपाच्या सत्तेमुळे राज्यात एक विश्वासार्ह सरकार येईल. ज्यामुळे रोजगार, विकास अशा समस्या सुटतील. राज्यात बसपाची सत्ता आल्यास हा आनंददायी बदल असणार आहे. राज्यातील जनता सध्या अनेक गोष्टींचा सामना करत आहे. बसपाची सत्ता आल्यास हे तणावाचे वातावरण कमी होईल असा विश्वास मायावती यांनी दिला आहे.

mayavati
कधी काळी होता राजेशाहीचा थाट; वाचा मणिपूरचा रंजक इतिहास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com