भाजपचा मास्टर प्लान; निवडणुकीपूर्वीच 100 आमदारांचं तिकीट कापणार

Amit Shah
Amit Shahesakal
Summary

एवढ्या आमदारांची तिकिट कापून पक्षाला निवडणुकीत फटका बसू शकतो, अशीही चर्चा भाजपात रंगलीय.

लखनौ (उत्तर प्रदेश) : यूपी विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Election) भाजपच्या प्लॅनला धार देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) स्वतः सक्रिय झाले आहेत. ते 29 ऑक्टोबर रोजी लखनौ दौऱ्यावर येत असून 'मिशन यूपी'च्या (Mission UP) अंमलबजावणीसाठी भाजपच्या दिग्गजांसह संघटनेच्या इतर नेत्यांची ते बैठक घेणार आहे. अमित शहांच्या या दौऱ्यामुळे यूपी भाजपमध्ये घबराट निर्माण झालीय. कारण, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आपल्या विद्यमान आमदारांपैकी एकतृतीयांश आमदारांची (MLA) तिकिटं कापण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्या नेत्यांचा पत्ता कट होणार?

या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश असणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. या नेत्यांची संख्या जवळपास 100 पर्यंत जाऊ शकते. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बळकट करण्यासाठी इतर पक्षांतून भाजपात आलेल्या, परंतु हायकमांडच्या अपेक्षेप्रमाणे न वागलेल्या भाजप आमदारांचा यात समावेश असल्याचे भाजपच्या सूत्रांचं म्हणणं आहे. यात काही दिग्गज नेत्यांचाही समावेश असू शकतो. ज्यांचं काम समाधानकारक नाही, शिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ते खराब करू शकतात, अशांचा पत्ता कट होणार असल्याचं कळतंय.

Amit Shah
भाजपच्या उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये स्थान?

या निर्णयामुळं भाजपचं नुकसान?

एवढ्या आमदारांची तिकिट कापून पक्षाला निवडणुकीत फटका बसू शकतो, अशीही चर्चा भाजपात रंगलीय. याचा विपरीत परिणाम पक्षावर होऊ शकतो. मात्र, मोदी-शहा यांची निवडणूक रणनीती जाणणाऱ्यांचं म्हणणं आहे, की हे दोन्ही दिग्गज अशी जोखीम घ्यायला अजिबात मागेपुढे पाहत नाहीत.

Amit Shah
50 एअर होस्टेस पोहोचल्या भरचौकात अन् त्यांनी कपडेच उतरवायला सुरुवात केली

2017 च्या निवडणुकीत भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना 39.67 टक्के मते मिळाली होती. पुन्हा एकदा भाजपला त्यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. हेच लक्षात घेऊन भाजपनं दीड कोटी नवीन सदस्य जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सध्या भाजपचे 2.3 कोटी सदस्य आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शाह यांना पीएम मोदींनी 'मॅन ऑफ द सीरिज' घोषित केलं होतं आणि शाह यांनी ते सिद्धही करुन दाखवलं. आता पुन्हा एकदा शहा अशीच काहीशी व्यूहरचना आखत असल्याचं दिसत आहे.

Amit Shah
'वर्दीवर टोपी घालायला लाज वाटते, स्‍वत:ला हिरो समजता'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com