
उत्तर प्रदेशातील एटा येथील जलेसरमध्ये एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका मुलीला तिच्या हक्कांची इतकी जाणीव झाली की तिने थेट तिच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कारण ते तिला शिक्षण घेण्यापासून रोखत होते. आता पोलिसांनी मुलीला दहावीत प्रवेश मिळवून दिला आणि तिला नोएडा येथील नारी निकेतनमध्ये पाठवले आहे.