UP IPS Transfer : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारचा मोठा निर्णय; उत्तर प्रदेशात सात एडीजींसह ३० वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Uttar Pradesh News | IPS Transfer | Yogi Adityanath Government : उत्तर प्रदेशात २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले. सात एडीजींसह ३० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून वाराणसी, प्रयागराज, गाझियाबाद आणि नोएडाचे पोलीस आयुक्त बदलले.
उत्तर प्रदेश : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, ७ अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) आणि ४ पोलीस आयुक्तांसह ३० वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.