"योगी सरकार नंबर वनच पण...", अखिलेश यादव बरसले

खोटे आणि द्वेष जोपासणाऱ्यांकडून चांगल्या अपेक्षा कशा ठेवता येतील.
अखिलेश यादव
अखिलेश यादव sakal media

लखनऊ : उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) नंबर एक स्थानावर नेल्याचा दावा करणाऱ्यांनी खरोखरच राज्याला कोठडीतील मृत्यू, उपासमारी, शेतकरी आत्महत्या, सरकारी मालमत्ता विकणे या प्रकरणांमध्ये पहिल्या स्थानावर नेऊन ठेवले आहे, असा घाणाघात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Samajwadi Party Akhilesh Yadav) यांनी योगी आदित्यानाथ (Yogi Adityanath) यांचे नाव न घेता केला आहे. यावेळी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचे नाव घेत योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. त्यांचा लाडका बुलडोझर लखीमपूर खेरीवर कधी जाणार हे योगीजींनी सांगावे, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या (Corona Second Wave) दुसऱ्या लाटेत (Death Due to Oxygen In UP) ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा या सरकारन केला आहे. मग सिलिंडरसाठी राज्यातील रस्त्यांवर कसा काय गोंधळ झाला, असा प्रश्नदेखील यावेळी अखिलेश यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, 2022 मध्ये आपले सरकार स्थापन होणार असल्याची खात्री असल्याची भावना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना आहे. त्यांनी अनेकदा हा आचारसंहितेपूर्वीचा हा ट्रेलर आहे, पुढे जाऊन बघा असेदेखील म्हंटले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात सपाचे सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे.

अखिलेश यादव
ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी

योगी सरकार पाच वर्षे आश्वासनांवरच राहिले

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले की, खोटे आणि द्वेष जोपासणाऱ्यांकडून चांगल्या अपेक्षा कशा ठेवता येतील. पाच वर्षांपूर्वी विद्यमान सरकार सत्तेत आलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. हे सरकार गुन्हेगारांवर बुलडोझर चालवते पण अलाहाबाद आणि लखीमपूर खेरीमध्ये बुलडोझर कधी चालवणार. हे सरकार पोलिसांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याची भाषा करते. पण गोरखपूर आणि लखनऊमध्ये जे घडले ते कोणी कसे विसरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com