Crime News: दोन मित्रांना घरी घेऊन आला, बायकोला गुंगीचं औषध टाकलेलं नुडल्स खायला दिलं अन्...

Crime News: पतीनेच आपल्या दोन मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार केला आहे.
crime news
crime news

लखनऊ- उत्तर प्रदेशचा महोबामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच आपल्या दोन मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार केला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्नीला चायनिज नुडल्समध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या माहितीनुसार, एक आरोपी गावातील ग्राम प्रधानचा छोटा भाऊ आहे. त्यामुळे पोलीस तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत होते. त्यानंतर महिलेने पोलीस अधीक्षकांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर एफआयर दाखल करुन घेण्यात आला आहे. पतीनेच असे कृत्य केले असल्याने पत्नी धक्क्यामध्ये आहे. शिवाय गावकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

crime news
Nashik Crime News : तिघींच्या मंगळसूत्रावर चैनस्नॅचरचा डल्ला; आडगाव 2 तर, गंगापूरला 1 जबरी चोरीची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पती आपल्या दोन मित्रांसोबत घरी आला होता. त्याने सोबत चायनिज नुडल्स आणलं होतं. महिलेने घरी स्वयंपाक बनवला होता.पती आणि त्याच्या दोन मित्रांनी जेवण केलं. महिलेने नुडल्स खाल्ले आणि ती घरकामाला लागली. पण, चायनिज नुडल्समध्ये गुंगीचं औषध टाकल्याची तिला कोणतीही कल्पना नव्हती. नुडल्स खाल्ल्यानंतर महिला बेशुद्ध पडली.

आरोप असा आहे की, पती, त्याचा मित्र भगवानदास आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीने महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. महिलेला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती निर्वस्त्र होती. तिला आपल्यावर अत्याचार झाल्याचं समजलं. पतीला तिने याबाबत जाब विचारला, पण पतीने उलट तिलाच धमकी दिली. पतीने महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे

crime news
Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

महिलेच्या सासरच्यांनी देखील गोष्ट बाहेर जाऊ नये यासाठी धमकवल्याचं कळतंय. पण, महिलेने आपल्यासोबत झालेली आपबीती माहेरच्यांना सांगितली, तेव्हा सर्वांना धक्का बसला. पीडितीने सांगितलं की, आरोपी भगवानदास गावाच्या प्रधानाचा छोटा भाऊ आहे. त्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com