BJP | भाजपच्या जाहिरातीत चीनच्या विमानतळाचे फोटो ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP
BJP | भाजपच्या जाहिरातीत चीनच्या विमानतळाचे फोटो !

BJP | भाजपच्या जाहिरातीत चीनच्या विमानतळाचे फोटो !

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी (ता.२५) नोएडाच्या जेवरमध्ये केंद्र आणि योगी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक जेवर विमानतळाचे भूमिपूजन केले. या निमित्त भाजपच्या काही नेत्यांनी एक फोटो पोस्ट केले असून त्याला जेवर विमानतळ असल्याचे म्हटले आहे. सदरील फोटो बनावटी असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही आपल्या ट्विटमध्ये म्हटले, की भाजपच्या खोट्या कामांची प्रत्येक छायाचित्रे उधार आहेत. मग खोटे दावे करणाऱ्यांचे विचार कसे प्रामाणित असतील? वास्तविक योगी सरकारमधील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्याने आपल्या ट्विटमध्ये विमानतळाचे छायाचित्र शेअर करताना लिहिले होते की, आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाच्या रुपात नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याबरोबर ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणत आहे.

हेही वाचा: तामिळनाडूत पावसामुळे जनजीवन विस्कळीत; शाळा, महाविद्यालयांना सुटी

यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळेल आणि परिसराच्या विकासाला गती मिळेल. युपीचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनीही तेच छायाचित्र शेअर करत त्याला जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटले. भाजप नेत्यांच्या या दाव्यांचे सोशल मीडियावर लोकांनी खंडण केले आहे. लोकांच्या दाव्यानुसार ज्या छायाचित्राला जेवर विमानतळ सांगितले जात आहे, ते चीनमधील बीजिंगचे दाक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मात्र केशव प्रसाद मौर्या यांनी आपले ट्विट डिलीट केले आहे. सोशल मीडियावर त्या छायाचित्रावरुन लोक भाजपवर खोटारडेपणाचा आरोप करित आहेत. प्रज्ज्वल यादव म्हणतात, खोटारडे भाजप सरकार. हे तर बीजिंग विमानतळ आहे, असे अली मुर्तजा यांनी म्हटले.

loading image
go to top