

up police passing out parade yogi adityanath
esakal
उत्तर प्रदेश पोलीस दलाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे. तब्बल ६०,२४४ नवीन सिपाही आज अधिकृतपणे पोलीस दलात सामील झाले असून, यामुळे युपी पोलिसांची ताकद प्रचंड वाढली आहे. लखनौमध्ये आयोजित भव्य 'पासिंग आऊट परेड'मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या नवीन जवानांना संबोधित केले.
२६ एप्रिल २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील ११२ केंद्रांवर एकाच वेळी हा दीक्षांत सोहळा पार पडला. लखनौच्या मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी खुली जिप्सीतून परेडची पाहणी केली. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महिला शिपायांचा असलेला मोठा सहभाग.