

UP
esakal
देश: उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेतील एका प्रश्नामुळे सुरू झालेला 'पंडित' शब्दाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व भरती बोर्डाच्या अध्यक्षांना कडक ताकीद दिली आहे.
शनिवारी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (SI) भरती परीक्षेतील हिंदीच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. "संधीनुसार बदलणारा" (अवसरवादी) या शब्दासाठी पर्यायांमध्ये 'पंडित' हा शब्द देण्यात आला होता. यावरून ब्राह्मण समाजात आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली.