UP Government : सावधान! युपीत जमीन घेताय? आता 'पॅन कार्ड'शिवाय रजिस्ट्री विसरून जा; योगी सरकारचा बेनामी मालमत्तांवर सर्जिकल स्ट्राईक!

UP property registration PAN Aadhaar 2026 : उत्तर प्रदेश सरकारने घर-जमीन खरेदीसाठी PAN कार्ड अनिवार्य केले; फसवणूक, बेनामी मालमत्ता आणि काळ्या पैशावर नियंत्रण, डिजिटल पडताळणीने रजिस्ट्री प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित केली.
UP property registration PAN Aadhaar 2026

UP property registration PAN Aadhaar 2026

sakal

Updated on

UP Land Registration New Rules : उत्तर प्रदेशात घर किंवा जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी योगी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. आता रजिस्ट्री करण्यासाठी केवळ आधार कार्ड असून चालणार नाही, तर पॅन कार्ड (PAN Card) देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मालमत्तांच्या व्यवहारात होणारी आर्थिक फसवणूक आणि काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी हा मोठा बदल केला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून राज्यात आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी आधीच अनिवार्य करण्यात आली होती, आता त्यात पॅन कार्डच्या ऑनलाइन व्हेरिफिकेशनची भर पडली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पॅन कार्ड नसल्यास 'फॉर्म-६०' भरून रजिस्ट्री करण्याची जी सवलत होती, ती आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com