
uttar pradesh scholarship yogi
esakal
दिवाळी जवळ येत असतानाच, उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यंदा नवरात्रीतच शालेय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहेत. नववी-दहावी आणि अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची सुरुवात २६ सप्टेंबरपासून केली जाईल. ही एक ऐतिहासिक घटना आहे, कारण आतापर्यंत फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया पहिल्यांदाच सप्टेंबरमध्ये सुरू होत आहे.