

UP Encounter
sakal
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात काल रात्री उशिरा दोन वेगवेगळ्या ठिकाणी—कोतवाली देहात आणि मोतिगरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत—पोलिसांची गुंडांशी जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन गुंडांच्या पायाला पोलिसांची गोळी लागल्याने ते जखमी झाले. जखमी गुंडांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या कारवाईत एकूण ५ गुंडांना अटक करण्यात आली आहे.