

Upper Ganga Canal Closure
sakal
उत्तराखंड :उत्तराखंडमधील हरिद्वारपासून उत्तर प्रदेशातील कानपूर देहातपर्यंत जाणाऱ्या उत्तर खंड गंगा कालव्याचा (Upper Ganga Canal) पाण्याचा प्रवाह दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. दिवाळीच्या रात्रीपर्यंत म्हणजेच साधारण १८ ते २० दिवस ही बंदी राहणार आहे. या काळात कालव्याची स्वच्छता, गाळ उपसा, घाटांची डागडुजी आणि विविध पायाभूत सुविधांची दुरुस्ती केली जात आहे.
ब्रिटिश काळात सिंचनाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या या ऐतिहासिक कालव्याची देखभाल आणि नियंत्रण उत्तर प्रदेश पाटबंधारे विभागाकडे आहे. कालव्यात पाणी वाहत असताना तळातील गाळ काढणे आणि भिंतींची दुरुस्ती करणे शक्य नसते. त्यामुळे दरवर्षी ठरावीक कालावधीसाठी पाण्याचा प्रवाह थांबवून ही कामे केली जातात.