Marathi Youth Harassed in UP for Not Speaking Bhojpuri : राज्यात सध्या मराठीच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. मराठीत बोलत नाही, म्हणून मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केली आहे. या घटनेचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटायला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात, एका मराठी तरुणाला भोजपुरी येत नाही, म्हणून दमदाटी करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.